नारायण धारप
http://www.esakal.com/esakal/08192008/SpecialnewsC35FDA4908.htm
नारायण धारप यांचे निधन

पुणे, ता. १८ - प्रसिद्ध भयकथा आणि विज्ञानकथालेखक नारायण धारप (वय ८२) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
तीन वर्षांपासून धारप यांना फुफ्फुसाचा विकार होता. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाला. विकार बळावल्याने रात्री दहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. धारप यांच्या पार्थिवावर उद्या (ता. १९) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धारप यांचा जन्म २७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून बी. एस्सी. टेक ही रसायनशास्त्र विषयातील पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याच सुमारास "अनोळखी दिशा' हा त्यांचा पहिला भयकथासंग्रह प्रकाशित झाला. "समर्थ' ही त्यांची व्यक्तिरेखा आणि समर्थकथा गाजल्या. "चंद्राची सावली', "गोग्रॅमचा चितार', "नेनचिम' यासह त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांची संख्या सव्वाशेच्या जवळपास आहे. मार्चअखेरपर्यंत त्यांचे लेखन सुरू होते.
ही बातमी वाचली, आणि अक्षरशः नातेवाईक गेल्याचे दुःख झाले. १९७० पासून त्याचे साहित्य वाचतोय. पहिली कादंबरी वाचली, चंद्राचे सावली. खरोखर मूर्तिमंत भय. ती कल्पना, काही औरच. नंतर वाचली "ऐसी रत्ने मेळवीन" अशी कल्पना कोणीतरी करू शकतं, यावर विश्वासच बसू शकत नाही. एवढ्या मुलांमधून काही असामान्य, प्रगल्भ, मुलांचा शोध लावून त्यांच्यातील शक्तीचा परलोकी वापर करून करून घेण्याची कल्पना, बस तिथे नारयण धारपच पाहिजेत. बाबूराव अर्नाळकरांनी काही व्यक्तीरेखा अजरामर केल्या, काळापहाड, झुंजार वगैरे, त्याच प्रमाणे ’समर्थ’ व्यक्तीरेखा समर्थपणे नारायण धारपांनीच पेलली. रसायनशास्त्राचा पदवीधर असं काही लिखाण करू शकतो? पण सर्व रसायन अगदी जमून गेलं.
त्यानंतर अनेक लेखकांनी हा भयकथा, गूढकथा प्रकार पुढे नेला, पण नारायण धारप एकमेवच.
१९८०च्या सुमारास आमचा असा एक ग्रुपच होता, त्यांच्या कादंबर्य़ा, कथासंग्रह वाचणार्यांचा. पुस्तक आले रे आले की, ते केव्हा वाचतो असे होणार. मग सर्वांनी वाचल्यावर, चर्चा होणार.त्यासाठी शासकीय विभागीय ग्रंथालयावर रोज हजेरी. झालं नारायण धारप गेले आणि भयकथा, गूढकथा हा विषयच संपला.
Labels: मी मराठी
दिलीप खापरे@9:27 PM
<

4
(1)
@ Add
. . ° º o O o º ° . .