पंचमातील शनी आणि संततीसौख्य

हा लेख बघा!!  | ही अनुदिनी बघा!!  | धोंडोपंत|7/5/2008 1:48:48 PM|RSS  | Other Entries


लोकहो,

आत्ताच एका ताईंची संततीच्या प्रश्नासंबंधी पत्रिका पहात होतो. संतती हा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे पंचमातल्या शनीबद्दल येथे अगदी थोडक्यात माहिती देतो.

१) पंचमातील शनी हा संततीसुखासाठी चांगला नाही.

२) मिथुन, सिंह, कन्या आणि कुंभ या वंध्या राशी आहेत. यापैकी कोणतीही राशी पंचमात असून त्यात शनी असेल तर गर्भधारणा होणे कठीण असते.

३) जर शनी पंचमात उच्चीचा म्हणजे तुळेचा आणि स्वगृही फक्त मकरेचा (कुंभेचा नव्हे) असेल तर संततीसुख व स्त्रीसुख चांगले मिळते. हा शनी नोकरीत उच्च जागा मिळवून देतो. स्थावर आणि जंगम मालमत्ता सुद्धा देतो. पण तो तुळेचा किंवा मकरेचा असून त्यावर पापग्रहांचे कुयोग नसले पाहिजेत.

४) पंचमात शनी जर पापग्रहयुक्त, नीचेचा वा शत्रुराशीत असेल तर संततीसुखात व्यत्यय आणतो. या लोकांना मुले अनियमितपणे होतात. त्याचप्रमाणे मुलांना काही व्यंग असण्याची शक्यता असते.

५) पंचमात मेषेचा शनी कानाचे विकार देतो. कान वाहणे, कानावर शस्त्रक्रिया( मंगळाच्या योगात) आणि बहिरेपणा ही फले पंचमातील मेषेचा शनी देतो.

६) पंचमातील मेषेचा शनी स्त्रीकुंडलीत गर्भाशयाची पीडा देतो. या स्त्रियांना आर्तवासंबंधी त्रास, पाळीच्या वेळेस ओटीपोटात दुखणे, कमी स्त्राव जाणे अशा गोष्टींना सामोरे जावे लागते.

७) स्त्रीकुंडलीमध्ये पंचमातला शनी जर हर्षलबरोबर युतीत किंवा प्रतियोगात असेल किंवा पंचमातल्या शनीवर हर्षलचा केंद्रयोग किंवा षडाष्टक असेल तर अशा स्त्रियांचे गर्भाशयाचे मुख आकुंचित असते.

८) हा शनी संततीस विलंब लावतो. साधारणपणे शनीचा एक फेरा पूर्ण झाल्यावर या स्त्रियांना संतती होते.

९) पंचमातील वक्री शनी कन्यासंतती देतो.

१०) पंचमात शनी वक्री आणि संततीकारक गुरू ६/८/१२ या स्थानी वक्री असता प्रथम एक मूल होते आणि पुढे १०/१२ वर्षे मूल होत नाही. दोन मुलांच्यात अंतर प्रचंड असते.

११) पंचमात शनी-राहु, शनी-केतु, शनी-हर्षल हा निपुत्रिक योग आहे. त्याचप्रमाणे रवि-शनी युती आणि प्रतियोगाची फलेही संततीविरोधक आहेत.

१२) पंचमस्थान हे प्रणयाचे स्थान आहे. येथे असलेला शनी प्रणयात सुख समाधान देत नाही. अशा लोकांचा प्रेमभंग अटळ असतो. प्रेमविवाह फिसकटतात.

१३) पंचमातील शनी हा वायदे, सट्टा, जुगार, शर्यती यात यश देत नाही. त्यात तो वक्री किंवा मंगळ हर्षलने बिघडलेला असेल तर पैसा कमविण्यापेक्षा तो गमविण्यासाठीच हे लोक यात गुंतलेले असतात.

१४) संततीकारक गुरूवर शनी-मंगळाची संयुक्त दृष्टी असेल आणि गुरू स्वत: दुर्बल असेल तर मुले होऊन जातात. हा मृतवंध्या योग आहे. अशा वेळेस गुरू जलचर राशीत म्हणजे कर्क, वृश्चिक, मीनेत असेल तर अनेक संतती होऊन त्यातील एखादी संतती वाचते.

१५) संततीकारक गुरूच्या सुखस्थानात म्हणजे चतुर्थात शनी राहू असतील तर ते संततीसुखास अनिष्ट होतात.

अजूनही बरेच काही सांगण्यासारखे आहे पण विस्तारभयास्तव आवरते घेतो.

आपला,
(मुद्देसूद) धोंडोपंत

जाताजाता-

डॉ. भालचंद्र नीळकंठ उर्फ बी. एन. पुरंदरे M.D., F.R.C.S.E., F.C.P.S., F.I.C.S., F.R.C.O.G., F.A.M.S., हे विश्वविख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसुतितज्ज्ञ होते.

तसेच ते ज्योतिषालंकार आणि ज्योतिष महामहोपाध्याय होते. एक उत्तम ज्योतिषी होते. त्यांच्याकडे जाणार्‍या अनेक महिलांना ते पत्रिका बघून त्यांच्या प्रसुतिसंबंधी सांगायचे.

तसेच पत्रिकेवरून कोणाला संतती होईल, कोणाला नाही, कोणाचा गर्भपात होणार, कोणाचे सिझेरियन करावे लागेल इत्यादी गोष्टी ते जाणून घेत असतं. आणि त्यांनी केलेल्या भाकिताप्रमाणे पुढील गोष्टी घडल्या असे आढळून येत असे.

डॉं. पुरंदरे यांनी "शल्य-कौशल्य" नावाचे त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात ज्योतिषशास्त्राची वैद्यकीयशास्त्राशी सांगड घालून अत्यंत गुंतागुंतीच्या केसेसमध्ये योग्य निर्णय घेणे कसे शक्य झाले ते सोदाहरण दाखवून दिले आहे.

जिज्ञासूंनी "शल्य-कौशल्य" जरूर वाचावे.

आपला,
(सूचक) धोंडोपंत

© धोंडोपंत (http://dhondopant.blogspot.com/). Visit respective website for details. Above content is simply displayed using RSS/ATOM feed from respective website. {Khapre.org} does not own or is not responsible for any content on Marathi Blog Viewer.
Read other entries:

हस्तसामुद्रिक शास्त्राबद्दल लेखन
सनातन हिंदु धर्म चा ब्लॉग
स्वप्न - गझल
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
आषाढ शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश
आली गौराई अंगणी...........
पंचागाची माहिती लेख २
विसरू नको श्रीरामा मला.....
नवर्‍याची अवस्था
सावळो गोंधळ