मातीत पाय रोवून...

हा लेख बघा!!  | ही अनुदिनी बघा!!  | सौ. अनुराधा सचिन म्हापणकर|7/5/2008 1:49:05 PM|RSS  | Other Entries


मातीत पाय रोवून
घट्ट उभी राहिले..
वाळुसारखी ती
सरसर निसटून गेली
मला दूरवर मागे ठेवून..
तरी अधांतरी
लटके पाय सावरत
मी पुन्हा स्वत:ला
उभी ठेवते घट्ट..
.
त्या मातीत कधी न कधी
उभी राहीनच मी पाय रोवून..
.
.
संस्काराचे बाळकडु
मुलाना पाजताना सुद्धा
निसटून जातात हातातुन..
माझी दोन पिल्लं
अशीच त्या वाळुसारखी..
अंधातरी लोंबकळणारे हात
आणि.. लटक्या संवेदना
दोन्ही सावरत..
मी उभी रहाते पुन्हा घट्ट..
.
माझीच माती ती...
कशी जाईल निसटून..!!!!
.
.
.
.
माती माय
सौ. अनुराधा म्हापणकर

© सौ. अनुराधा सचिन म्हापणकर (http://anuradhamhapankar.blogspot.com/). Visit respective website for details. Above content is simply displayed using RSS/ATOM feed from respective website. {Khapre.org} does not own or is not responsible for any content on Marathi Blog Viewer.
Read other entries:

ब्युटी-पार्लर...
एबनॉर्मल..??
विस्कटलेले आयुष्य..
मूडमधे असतील का रे ते दोघे..??
एक बातमी तीच तीच..
पावसात भिजत गाणं कसं बरं गुणगुणायचं..?
लाइफ़ इज ब्युटीफुल
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
नकोस बोलू शब्दांनी तू..
जन्नत की सैर..