जातोस ना.. जा...
हा लेख बघा!!
| ही अनुदिनी बघा!!
| सौ. अनुराधा सचिन म्हापणकर|7/5/2008 1:48:41 PM|RSS
| Other Entries |
|
|
|
जातोस ना.. जा... अजिबात.. थांबु नकोस .. जाताजाता साधा वळूनसुद्धा पाहू नकोस.. निरोपाचा अर्धा हातसुद्धा हलवू नकोस.. कसली अपेक्षा नाही.. आणि आता तर कसली इच्छासुद्धा नाही.. . आई होण्याची किंमत मोजेन मी एकटीच.. एकांताला माझ्या आता वाचा फोडू नकोस.. . जातोस ना.. जा... अजिबात थांबु नकोस.. . . तुझ्या आवडी निवडीसाठी झिजत राहिले अखंड स्वत:साठी जगेन उरलेले हे स्वप्न तरी आता मोडु नकोस . जातोस ना.. जा... अजिबात थांबु नकोस .. . . जग तुझ्यावर हसेल.. कुपुत्र म्हणुन हिणवेल.. तरी डोळ्यांवरची झापडं दूर सारु नकोस.. . जातोस ना.. जा... अजिबात थांबु नकोस .. . ऐक एकच शेवटचे.. पुन्हा त्रास नाही देणार अशीच एके दिवशी मी शेवटला श्वास घेणार.. कुडीतून सोडताना प्राण तुला क्षमासुद्धा करणार . पण.. शपथ आहे तुला बाळा.. पाजलेल्या त्या दुधाची.. बेवारस राहुदे.. कलेवर माझे... लोक लज्जेस्तवही मला अग्नी द्यायला तू येऊ नकोस.... . जातोस ना.. जा... अजिबात थांबु नकोस .. जाताना साधा वळूनसुद्धा पाहू नकोस..
. . सौ. अनुराधा म्हापणकर |
© सौ. अनुराधा सचिन म्हापणकर (http://anuradhamhapankar.blogspot.com/). Visit respective website for details. Above content is simply displayed using RSS/ATOM feed from respective website. {Khapre.org} does not own or is not responsible for any content on Marathi Blog Viewer. |
|
|