पहाटे पहाटे ,तुझी याद आली...
तुझ्या चाहुलीने ,मला जाग आली....
निशा काजळाची, दिसे पापणीत ...
अंधारात त्यांच्या ,पुन्हा झोप आली...
उषा आळसावे ,तुझी भेट होता...
निशेला वदे ती , जरा झोप आली...
तुझा स्पर्श होता, निद्रा दूर गेली
पहाटे पहाटे ,नशा आज आली...
कळेना मला ही ,कशी रात गेली...
स्वप्नी माझिया तू , मना ओल आली...
नको जाऊ अशी ,मला झोपवूनी
तुझ्या सोबतीची ,मला झिंग आली...
.....अरविंद