HOME|mr|sahitya|abhang|chokhamela|01|
संत चोखामेळा सुंदर मुखकमल कस्तुरी म संत चोखामेळा वैकुंठ पंढरी भिंवरेचे
संत चोखामेळा - जाणतें असोनी नेणतें पै...


श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.



54
पंढरीमहिमा

जाणतें असोनी नेणतें पैं झालें । सुखाला पावलें भक्तांचिया ॥१॥

कैसा हा नवलाव सुखाचा पाहा हो । न कळे ज्याची माव ब्रह्मादिकां ॥२॥

तो हरी समर्थ पंढरीये उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥३॥

चोखा म्हणे आमुचें दिनांचें माहेर । तें पंढरपुर भीमातटीं ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
54
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-01-07T02:25:42.3257488Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us