HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
संत चोखामेळा आपुलिया सुखा आपणचि आला संत चोखामेळा पंढरीचे सुख नाहीं त्रिभुव
संत चोखामेळा - ज्या सुखा कारणें योगी ...


श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.



45
पंढरीमहिमा

ज्या सुखा कारणें योगी शिणताती । परी नव्हे प्राप्ती तयांलागीं ॥१॥

तें प्रेमभावें पुंडलिका वोळलें । उघडेंचि आलें पढरीये ॥२॥

कर ठेवोनी कटीं उभा पाठीमार्गे । भक्तांचिया पांगे न बैसेचि ॥३॥

युगें अठ्‌ठावीस होऊनियां गेलें । नाहीं पालटलें अद्यापवरी ॥४॥

चोखा म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी । कीर्ति चराचरीं वानिताती ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-01-07T02:31:35.4034496Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us