HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|श्री दत्तात्रेयाचे अभंग|
श्रीदत्तात्रेयाचे अभंग मोक्षाचें तें मूळ सत्संग श्रीदत्तात्रेयाचे अभंग पतिताचा तात तूंचि भगवंत ।
श्रीदत्तात्रेयाचे अभंग - संत ओळखावे शीतळ स्वभावें ...


दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatreya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.



46
अभंग

संत ओळखावे शीतळ स्वभावें । तनु मन भावें सेवा कीजे ॥१॥

मृदु नवनीत कठिण पर्वत । प्रसंग उदित होई जैसा ॥२॥

मुखीं रामनाम अन्य नसे काम । पाहतां विश्राम वाटे जीवा ॥३॥

पर उपकारें झिजविती देह । ब्रह्मांडीं निःस्नेह वर्तताती ॥४॥

आप पर नाहीं निःसंग सदाही । रागद्वेष कांहीं नसे जेथें ॥५॥

दया तोचि धर्म दान तेंचि कर्म । तितिक्षेचें वर्म मूर्तिमंत ॥६॥

पतित उद्धार हाचि कुलाचार । ’रंग’ मिथ्याचार लेश नसे ॥७॥

Translation - भाषांतर

N/A
46
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T09:18:57.4325952-04:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us