जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.
आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार ॥१॥
सांडूनियां थोरपण । करी दळण कांडण ॥२॥
नारिरुप होउनी हरी । माझें न्हाणें धुणें करी ॥३॥
राना जाये वेंची शेणी । शेखीं वाहे घरीं पाणी ॥४॥
ठाव मागें पायापाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥