HOME|mr|sahitya|abhang|janabai|01|
संत जनाबाई नामदेवाचे घरीं । चौदाजण स संत जनाबाई धरा सतराचा हो मेळा । कारख
संत जनाबाई - माझा नामा मज देंई । जीव द...


जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.



40
अभंग

माझा नामा मज देंई । जीव देईन तुझे पायीं ॥१॥

पुंडलिका भुलविलें । तैसें माझिया बाळा केलें ॥२॥

तें गा न चले मजपाशीं । दे गा माझ्या नामयासी ॥३॥

तुझ्यासंगें जे जे गेले । ते त्वां जितेचि मारीले ॥४॥

विठ्‌ठल म्हणे गोणाबाई । नामा तुझा घेवोनी जांई ॥५॥

हातीं धरोनियां आली । दासी जनी आनंदली ॥६॥

Translation - भाषांतर

N/A
40
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-28T01:54:51.1565776Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us