HOME|mr|sahitya|balsahitya|balgeete|01|
बालगीत सांग मला रे सांग मला  आई बालगीत आईसारखे दैवत सा र्‍या ज
बालगीत - आई व्हावी मुलगी माझी ,...


बालगीत लहान मुले आनंदाने गातात.
Balgeet is always sung by children with fun and joy


41
बालगीत

आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई

नको बोलणी खारट, आंबट, विटले विटले बाई

सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी

आंघोळीच्या वेळी चोळा, डोईस शिक्केकाई

’केस कोरडे कर ग पोरी’, सात हात त्या जटा विंचरी

’नको पावडर दवडू बाई’, कोकलते ही आई

शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका जाचणी

लहान भावादेखत अगदी कान पकडते बाई

गीत - ग. दि. माडगूळकर

Translation - भाषांतर

N/A
41
References : http://aathavanitli-gani.com/
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-08-23T16:59:06.0000000Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us