HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बहिणाबाई चौधरी|
गोसाई तठे बसला गोसाई धुनी पेटय हिरीताचं देनं घेनं  नको लागूं जीवा  सदा मतल
गुढी उभारनी - गुढीपाडव्याचा सन आतां उभ...


बहिणाबाईंची गाणी

बहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते

Bahinabai has specifically acknowledged Tukaram as her Guru and that he initiated her has been clearly expressed in all her Abhangas.

 



1
गुढी उभारनी

गुढीपाडव्याचा सन

आतां उभारा रे गुढी

नव्या वरसाचं देनं

सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी

आतां पाडवा पाडवा

तुम्ही येरांयेरांवरी

लोभ वाढवा वाढवा

अरे, उठा झाडा आंग

गुढीपाडव्याचा सन

आतां आंगन झाडूनी

गेली राधी महारीन

कसे पडले घोरत

असे निस्सयेलावानी

हां हां म्हनतां गेला रे

रामपहार निंघूनी

आतां पोथारा हे घर

सुधारा रे पडझडी

करीसन सारवन

दारीं उभारा रे गुढी

चैत्राच्या या उन्हामधीं

जीव व्हये कासाईस

रामनाम घ्या रे आतां

रामनवमीचा दीस

पडी जातो तो 'पाडवा'

करा माझी सुधारनी

आतां गुढीपाडव्याले

म्हना 'गुढी उभारनी'

काय लोकाचीबी तर्‍हा

कसे भांग घोटा पेल्हे

उभा जमीनीच्या मधीं

आड म्हनती उभ्याले

आस म्हनूं नही कधीं

जसं उभ्याले आडवा

गुढी उभारतो त्याले

कसं म्हनती पाडवा ?

Translation - भाषांतर

N/A
1
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-08-22T17:46:50.0000000Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us