HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बहिणाबाई चौधरी|
मानूस मानूस मानूस मतलबी रे मान आला पाऊस  आला पह्यला पाऊस शिपडली भ
मोट हाकलतो एक - येहेरींत दोन मोटा दोन्ही...


बहिणाबाईंची गाणी

बहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते

Bahinabai has specifically acknowledged Tukaram as her Guru and that he initiated her has been clearly expressed in all her Abhangas.

 



44
मोट हाकलतो एक

येहेरींत दोन मोटा

दोन्हींमधीं पानी एक

आडोयाले कना, चाक

दोन्हींमधीं गती एक

दोन्ही नाडा-समदूर

दोन्हींमधीं झीज एक

दोन्ही बैलाचं ओढणं

दोन्हींमधीं ओढ एक

उतरनी-चढनीचे

नांव दोन धाव एक

मोट हाकलतो एक

जीव पोसतो कितीक?

Translation - भाषांतर

N/A
44
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-08-22T17:50:41.0000000Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us