{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
Header

दत्तरक्षास्तोत्रम्.




देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.

In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise aspects of Devi and Devtas. Stotras are invariably uttered aloud and consist of chanting verses conveying the glory and attributes of God.

Content
दत्तरक्षास्तोत्रम्.

ह्या दत्तरक्षास्तोत्राचा । ऋषि अव्यक्त बोलिला ।

अनुष्ठुप छंद हा त्याचा । देवता दत्त योगिराट् ॥१॥

बीज द्रां शक्ति हीं क्लीं हें । कीलक वज्रसें महान् ।

धर्मार्थकाममोक्षार्थीं । विनियोग असे तथा ॥२॥

अथ ध्यानम्

माल कमंडलु लसे कर खालच्यांत ।

डमरुत्रिशूळ मधल्या करपद्मयुग्मीं ।

ऊंच द्विहस्तकमलीं शुभशंखचक्र ।

ऐशा नमूं विधि हरीश स्वरुप दत्ता ॥३॥

इति ध्यानम्

धरुनि ध्यान ऐसें हें । भावें सात्त्विक वंदुनी ।

मानसपूजनीं प्रेमें । तोषवूं गुरुमूर्तिला ॥४॥

पृथ्ची तत्त्वें करुं टीळा । लंब्रीर्जे हरुषें तथा ।

हं-बीजें व्योमतत्त्वें त्या । अर्पू पुष्पें यथा मति ॥५॥

यं-बीजें धूपवातात्मा । अग्न्यात्मा दीप रं तथा ।

नैवेद्यार्थी अमृतात्मा । कं-बीजें अर्पिला पुनः ॥६॥

सं-बीजें कल्पिलें शेष । नत्यादि सूपचार जें ।

सर्वार्पण बली तैसा । दास्यें देह दमूं मुदा ॥७॥

रक्षो दत्तात्रेय डोकें । भाल अत्रिसुतर्षभ ।

नासिका योगिराड् रक्षो । रक्षो नेत्र अनंतदृक् ॥८॥

रक्षो तोंड सर्वभक्षी । रक्षो ओठ जनार्दन ।

रक्षो जिह्वा शारदात्मा । रक्षो दंत दयानिधि ॥९॥

वनस्पतीश केसांना । वाताश्वारुढ कर्ण हे ।

रक्षो हनुवटी शूली । रक्षो कंठ कलानिधि ॥१०॥

स्कंध खं ब्रह्मरुपीं जे । रक्षो कांडीं कृपांबुधी ।

हात हारी अंगुलींना । रक्षो आरण्य वासी जो ॥११॥

रक्षो छाती सोमभ्राता । काळीज कर्मसाक्षी तो ।

हरि हृदय रक्षो हा । हृदयस्थ करो सदा ॥१२॥

विश्वंभर विश्वरुपी । रक्षो पोट सनातन ।

रक्षो कटि कामरुपी । जंघा आजानुबाहु जो ॥१३॥

जानु अत्रितनूत्पन्न । घोटे हे धनकांतिधृक् ।

नखें नानारुपधारी । वामनात्मा तथा पद ॥१४॥

यमरुपी गुदा रक्षो । रक्षो लिंग प्रजापति ।

कमेंद्रियें कर्मशून्य । ज्ञानी ज्ञानेंद्रियें तथा ॥१५॥

रक्षो मज्जा महामायी । मेद त्रैलोक्य मोहन ।

मांस मेधानिधी रक्षो । रक्तलोहित लोचन ॥१६॥

अस्थी आनंदमूर्ती हा । त्वचा तारुण्यमूर्तिमान् ।

रक्षो वीर्य चिरंजीवी । लाळ लावण्यसागर ॥१७॥

षड्‌भुजा चक्रषड्‌ रक्षो । सहस्त्रारनिवासी जो ।

आपदशीर्ष अद्वैत । नाऽयादि नररुपधृक् ॥१८॥

दुर्विकारांतून कामादि । रक्षो नृसिंह नाटकी ।

वासुदेव आधिव्याधि । उपाधींतून संयमी ॥१९॥

भूतप्रेतादिपासून । रक्षो श्रीपादवल्लभ ।

कालकाल दुर्ग्रहीतो । जन्ममृत्यूहूनी हर ॥२०॥

पूर्वेकडे वायुभक्षी । पश्चिमीं पावकोपम ।

उत्तरीं व्योमकेशी हा । रक्षा दैत्यारि दक्षिणीं ॥२१॥

चार कोणीं कामचारी । ऊंचीं अव्यक्त अतिथि ।

खालीं सश्चित्सुखात्मा जो । शेषछत्र स्थळीं स्थळीं ॥२२॥

मृत्यूचा मृत्यु मध्यें जो । मृत्युंजय चहूंकडे ।

जनीं जात्यनवच्छिन्न । सहवासीं वनीं तधा ॥२३॥

जलशायीं जळीं रक्षो । स्थाणुरुप स्थळीं स्थळी ।

अग्नीमध्यें अनंतात्मा । शस्त्रास्त्राहून तो बळी ॥२४॥

रक्षो दुष्टाहून दाता । खेचरीं तो खलांतक ।

व्यालादीं जो जगन्नाथ । भूचरीं हा भयानक ॥२५॥

जळीं जळचराहूनी । रक्षो पन्नगभूषण ।

सर्वस्थळीं जटाधारी । संकटी विषमस्थळीं ॥२६॥

जागतां स्मर्तृगामी तो । सूत्रात्मा स्वप्‍नदर्शनीं ।

मूर्छाकाळीं अमेयात्मा । निद्रेंत अनधाप्रिय ॥२७॥

रक्षो रोगी रोगशून्य । भोगी भोगद सर्वदा ।

स्वास्थ्यीं शर्मद शांतात्मा । सदा ब्रह्म दिगंबर ॥२८॥

दुर्भक्षीं अन्न्पूर्णेंश । सुभिक्षीं सकलार्तिहा ।

सूतकीं शरणत्राता । मंगलीं मोददायका ॥२९॥

रक्षो सदा सिद्वराज । सर्वत्र सर्वदा सुधी ।

क्षमापून दोष सर्व । यथा माता स्तनंधय ॥३०॥

दत्तरक्षा स्तोत्र हें जो । पठे भोगापर्वद ।

त्रिकाळीं एककाळीं वा । भय त्याला नडे कुठें ॥३१॥

औदुंबरतळीं कोणी । प्रातःकाळीं पढे नर ।

गृहांगणीं सांजकाळीं । अथवा शयनस्थळीं ॥३२॥

दुपारीं देवमंदिरीं । शुचिर्भूतपणें सदा ।

रक्षो भावें पढें त्याला । अत्रिवरप्रद तथा ॥३३॥

श्रीदत्त दत्त कुलतारक दत्त ।

श्रीदत्त दत्त रिपुमारक दत्त ।

श्रीदत्त दत्त भयहाकर दत्त दत्त ।

श्रीदत्त दत्त मुददायक दत्त दत्त ॥३४॥

स्मरतां रे दत्त दत्त । निर्जनीं देह हा पडो ।

पावो तृप्‍ति पशूपक्षी । मिष्टदेहान्नसेवनें ॥३५॥

ज्या ज्या स्थळीं हे मन जाय माझें ।

त्या त्या स्थळीं सद‌गुरु रुप तूझें ।

मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणीं ।

तेथें तुझें सद्‌गुरु पाय दोन्हीं ॥३६॥

Translation - भाषांतर

N/A
Details
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T03:10:00.4196944-04:00
|-|-|
Comments | अभिप्राय