{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
Header

भीमरूपी स्तोत्र




हनुमान वायुपुत्र आहे, त्यामुळे त्याच्यात प्रचंड शक्ति आहे.
Hanuman is son of a wind god Vayu. Hanuman is the Divine example of pure devotion and service.

Content
भीमरूपी स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥

महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका ॥२॥

दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥

ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥

ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं । सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥

ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥

कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे । मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥

आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥१०॥

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरु- मांदार धाकुटे ॥११॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके । तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥

आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥

धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही (समस्तही)। पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही । नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥१५॥

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली (बरी)। दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकला गुणें ॥१६॥

रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू । रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥१७॥

॥इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम श्री मारुतिस्तोत्रम् संपूर्णम् ॥

Translation - भाषांतर

N/A
Details
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-15T22:24:18.6876464-04:00
|-|-|
Comments | अभिप्राय