|
पु. - संख्या ; आंकडा ( १ , २ , ३ इ० );
- आंख ( अंकगणितांतील ).
' अंके जैसीं शुन्यें सद्यःकार्यक्षमे , न तीं अन्यें । ' - मोवन ६ . ३५ .
- खूण ; चिन्ह ; छाप ; शिक्का .
' अंक तो पडिला हरिचा मी दास । ' - तुगा १३३८ .
- नाटकाचा एक भाग ; कथाभागाला किंवा संविधानकाला विरोध दाखविणार नाहींत असे जे नाटकाच्या कथानकाचे विभाग त्यांना अंक म्हणतात . असें अंक चारपासुन बारापर्यंत असतात . अलीकडील सुमारें २५ वर्षातील गद्य - पद्य नाटके तीन अंकाचीं असतात .
' शांकुतल नाटकाचा चौथा अंक पार बहारीचा आहे .' - नाक ३.१.
- मांडी .
' आधार शक्तीचियां अंकी । वाढविसी कौतुकी।' - ज्ञा १२ . ५
- ( डोळ्याजवळचा ) आंख . भुंवई व कान यामधील जागा .
- डाग ; कलंक .
' सुत हो ! शुद्धांस कसें आतळलें व्यसन अंक हा रविला । ' - मोसभा ७ . ४२ .
- नियतकालिकाचा ( वर्तमानपत्र , मासिक इ० ) एक भाग , अनुक्रम , संख्या नंबर .
' साग्र हकीगत लांबलचक्र असलेमुळें पुढील अंकावर ठेवणें भाग आहे .' - विक्षिप्त १ . १४ .
सं . अंक ( अंक् = खूण करणें , मोजणें) लॅ . अंकस् ग्री. ओगकोस ०गणित न. - अंक किंवा व्यक्त संख्या यांचा विचार ज्यांत केलेला असतो तें शास्त्र . भास्कराचार्यांनीं याला ' पाटीगणित ' असें म्हटलें आहे . याची उभारणी संख्येंच्या कल्पनेवर असल्यामुळे याशास्त्राची उप्तत्ति व्यापाराचें मूळस्वरुप जे विनिमय त्यापासून फार प्राचीन काळीं झाली असावी .
- बीजगणिताच्या ( अक्षरगणिताच्या ) उलट याचे पूर्णाकगणित व अपूर्णोकगणित असे दोन भाग आहेत . यांत बेरीज , वजाबाकी , गुणकारी , भागाकार , वर्ग वर्गमुळ , धन , धनमूळ असे आठ प्रकार येतात .
' अंकगणिती कोट्या काढून नेटिवांस फसविण्याचे दिवस आतां राहिले नाहींत . ' - टि २ . ५२३. ०गति स्त्री. ( हिशेबाचे ) आंकडे मांडण्याची किंवा मोजण्याची पद्धत . ०चक्र न. (ज्योतिष) कालगणना चक्र . हें चक्र ५९ वर्षाचें असतें . या कालगणनेंत वर्षारंभ भाद्रपद शु . १२ ला समजतात . ६ किंवा ०ज्याच्या शेवटीं आहे तें वर्ष गणनेंत धरीत नाहींत . मद्रास इलाख्यांतील गंजम जिल्ह्रांतील लोक ओंको किंवा अंक नांवाच्या चांद्रसंवत्सरचक्रानुसार वर्ष मानितात . - ज्ञाको ( अं ) २७ . ०चालन न. - (ज्योतिष) अंकांचीं किंवा गणिती कोष्टकें , सारण्या
- निरनिराळ्या काळांना जुळतील असा अंकाचा फरक.
०जाल न. आंकड्याचें कोष्टक , सारणी , ( पंचागांचें गणित सोपें करण्यासाठीं तयार केलें ). ( अंक + जाल ) ०पट्टी स्त्री. - (कापडाच्या गांठीमधील) कापडाच्या अनुक्रमाची , किंमतीची किंवा इतर माहितीची चिठ्ठी ;
- बीजक
आंकपट्टी पहा . ०पाश पु. संख्यारचनेसंबधीं प्रकार . ( इं .) परम्युटेशन . ( सं .) ०मोडणी स्त्री. - आंकडेमोड ; हिशेब .
- अंक मांडण्याची पद्धत ( डावीकडुन उजवीकडे किंवा उजवीकडुण डावीकडे.)
- बोटें मोडून अंक मोजणे.
(अंक + मोडणी ). ०राशी स्त्री. - संख्येची मालिका
- ओळ
- रकमा ( बेजरेसाठीं .) ( सं .)
०लिपी स्त्री. - संख्यालेखनपद्धति ( आंकड्यांची - अक्षरांची नव्हे ), आंकडे लिहिण्याची पद्धति , अठरा लिपीपैकी एक .
- ज्यांत वाढे वगैरे लिहिले आहेत असें पुस्तक ; उजळणीचें पुस्तक . ( सं .)
०स्थल न. - स्थान - ( अंकगणित ) आंकड्यांची जागा .
' गणितांत अंकस्थानें नऊ आहेत .' ( सं .)
|