Dictionaries | References

उचलणें




v i   Rise; shoot up.
v t   Raise, to heave or lift up. Undertake. Incite. To snap up furtively.
अ.  क्रि .
स . क्रि .
वर येणें ; वर येण्याचे प्रकार -( अ ) पित्त , पुरळ , फोड , गळवें वगैरे शरीरावर उठणें , उत्पन्न होणें . गळूं कालच उचललें . ( आ ) पाण्यावर लाटा , बुडबुडे उत्पन्न होणें . जैशा उचलती लहरीवरी लहरी - दा ११ . ९ . १७ . ( इ ) जमिनीवर वारुळें , भोमे , उंचवटे तयार होणें . ( ई ) सारवलेल्या जागेवर खरपुड्या , पोपडे येणें ; वरचेवर सारवल्यानें जमीन लवकर उचलत नाहीं . ( उ ) आकाशांत ढग येणें . तेथें प्रळये मेघ उचलले । कठिण घोषें गर्जिन्नले । - दा १३ . ४ . १४ .
वर करणें - धरणें ; उठावणें . अंगीकारणें ; स्वीकारणें ; पत्करणें ( काम , भाग , भूमिका प्रांत ).
हातीं घेणें ; यंदा पैशाचें अळमटळम दिसतें आहे , नवें घर बांधावयाचें उचलूं नका लहानपणापासून यानें संसार उचलला . पुढें मूर्तिपूजा हळुहळु आर्यांनींहि उचलली असें दिसतें . - मसाप २ . २ . ११६ .
वाढणें ; लठ्ठ होणें ; मोठे होणें . हा उकिरडा भारी लवकर उचलला ?
उत्तेजन देणें ; उभा करणें ; मनांत भरविणें ; चेतविणें ; चेव आणणें ; इरेस पेटविणें ( वाद , मूल , इ . विषयीं ) त्याचे मनांत भाऊबंदांशीं आजच कजिया सांगावा असें नव्हतें परंतु लोकांनीं त्यास उचलला .
उठावणी करणें . म्हणे पांडवसैन्य उचललें । - ज्ञा १ . ८८ .
उंच होणें ; वाढणें ; अंकुर फुटून वर येणें . दोन दिवस पाऊस लागतांच झाडें उचललीं .
लांबविणें ; चोरणें .
उचलून येणें ; पोटांत अस्वस्थता वाटणें ; ढवळणें ; पित्त वर येणें ; ओकारी येणें ; मळमळणें . कालचे उपोषणामुळें क्षणोक्षणीं उचलतें . उचलून जाणें , येणें - वादाविषयीं , युध्दसंबंधीं आह्वान देणें ; वाद उत्पन्न करणें , ओढून आणणें , सुरुवात करणें ; चढाई करणें . जे जुंझावया उचलोनि आले असती . - गीताचंद्रिका १ . २२ . उचलून जाणें - लग्नास , विवाहास वरपक्षाच्या ठिकाणीं वधूपक्षानें इष्टमित्र आणि सामान यासह जाणें . उचलून बोलणें , गोष्ट सांगणें -
उचल करणें ; रक्कम घेणें . उचलून आपटणें - वर उचलून खालीं टाकणें ; मोठ्या जोरानें आपटणें ; आदळणें . उचलून देणें -
बढाई , बाता , झोकणें , मारणें .
( तुळशी , बेलपत्रें वगैरे वस्तू हातांत घेऊन ) शपथ घेणें ; कोणाच्या नांवानें ) संकल्प करणें .
स्वसंतोषानें उक्ती रकम कोणेकास देणें ;
ताठ्यानें उठून बोलणें .
वेगळें काढून देणें . तूं आमच्यांत जेवायला आलास तर कसें तरी भागवितां येईल . तुला बोर्डिगांत रहावयासाठीं पांच रुपये उचलून देणें जड जाईल , वाटल्यास जेवणास ये . उचलून धरणें -
आपला दर्जा न ओळखतां बोलणें . [ सं . उच्चलन ; सिं . उछिलणु ]
सतावून सोडणें ; धरणें घेऊन बसणें ; खणपटीस बसणें ; तगादा लावणें ; ओढून धरणें ( भिक्षेकरी वगैरेनीं . )
भारी अटी लादणें ; जबर किंमत , व्याज मागणें ( सावकार वगैरेनीं ).
एखाद्याचा विशिष्ट पक्ष स्वीकारणें ; जबाबदारी पत्करणें ; अभिमान बाळगणें ; समर्थन करणें ; आधार देणें . म्ह० उचलली जीभ लावली टाळ्याला = विचार न करितां मनास येईल तें बोलणें ; ताळतंत्र सोडून बोलणें .
To go with one's daughter and with the people and materials necessary, to the village of the intended husband; there to celebrate the marriage. This is a deviation from decorous usage. उचलून बोलणें or उचलून गोष्ट सांगणें To speak big; to talk high, loftily, vaingloriously &c.
and put into the hand of, i. e. to swear unto by गणपति &c. उचलून धरणें with ला of o. To dun hard; to worry and torture for payment or for alms;--used of a banker or a beggar. 2 To make high and hard terms; to ask high interest--a banker. 3 With g. of o. To lift up; to take the part of; to espouse and extol or vindicate.

Related Words

उचलणें   मोळी-मोळी उचलणें   देवावरची तुळस-फूल-बेल काढणें-उचलणें   दुमची उचलणें   चूड-उचलणें-धरणें-लावणें   दगड उचलणें - घेणें - फेकणें - मारणें   पाठ उचलणें   दगड उचलणें   पाऊल उचलणें, उचलून चालणे   दुःखाचा वांटा उचलणें   घोड्यांच्या अनीना अनीना उचलणें   गठडी उचलणें-उपटणें-पार करणें-लांबविणें   शीर-शीर-शिरें उचलणें   बिर्‍हाड उचलणें   भंवई-भंवई उचलणें   नांगर उचलणें-टाकणें-सोडणें   हात उचलणें   (एखाद्या कार्याची) तळी उचलणें-भरणें   जड पारडें उचलणें-उरकणें-पाहणें   मेखा उचटणें-उचलणें-उपटणें   पाय उचलणें   उरापोटावर उचलणें   गुळें उचलणें-काढणें   पापाचा वांटा उचलणें   विडा-विडा उचलणें   पैजेचा विडा उचलणें-उचलून देणें   तुळस उचलणें   टांग उचलणें   यशाचा विडा उचलणें-घेणें   बेलभंडार उचलणें-काढणें   हात उगारणें-उचलणें   गंगाजळी उचलणें   शिवावरचा बेल उचलणें-काढणें-घेणें   (घोड्याच्या) अनीना उचलणें   उचलणें   यशाचा विडा उचलणें-घेणें   हात उचलणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP