Dictionaries | References

ओकबोक

 स्त्री. दुफाशीं सोगंट्यांनी खेळण्याचा एक डाव . चारी रंगाच्या सोंगट्या एके ठिकाणी ठेवून नंतर एकेक गड्यानें फांसे टाकावयाचे ; ज्याला ज्या सोंगटीचें दान पडेल ती त्याने घ्यावयाची व त्या रंगाची संपली असेल तर आपल्या जवळची ओकावयाची म्हणजे पुन्हां मध्यें ठेवावयाची . फांशीवरील दान पांच पडलें तर काळी , दहा पडलें तर पिवळीं , बारा पडल्यास लाल व नऊ पडलयस हिरवी असें ठरलेलें असतें . अशा तर्‍हेनें एकेका रंगाचा कट झाला ( चारी सोंगट्या मिळविल्या ) म्हणजे मग ओकावयाला नको . मधील सर्व सोगट्या अशा डावानें घेऊन झाल्या म्हणजे कोणावर किती चढले तें ठरवावयाचें . २ ( ल .) हिसकाहिसकीं ; देणें घेणें .' हल्ली चाललेला ओकाबोकीच्या प्रकार सुधारलेल्या राज्यपद्धतीस गैरहिताचा आहे .' - टि १ . ५५७ . ( ओक द्वि .)

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP