Dictionaries | References

औक्षवण

See also:  औक्षण
 न. आरती ओवाळणें ; आरती ; निरांजन ; आरती वगैरे ठेवलेलें तबक किंवा लामणदिवा . लग्न कर्याच्या अथवा इतर शुभप्रसंगी देवाची मूर्ति किंवा ज्याचें मंगलकार्य असेल त्यास त्याच्या तोंडाभोंवती सुवासिनीनें ओवाळण्यासाठीं घेतलेलें दीपादियुक्त ताम्हन ; सदर ताम्हन ओवाळण्याची क्रिया ; ( सामा .) ओवाळणें . अक्षवाण पहा . ' त्या ( वधु ) बसल्यावर त्यांचें सुवासिनी स्त्रियांकडुन औक्षण होतें .' - ऐरापुविवि २६ . ( क्रि०करणें ). आयुष्यवर्धक विधि . ( सं . आयुष्य + वान किंवा वर्धन ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP