Dictionaries | References
क्ष

क्षत्र

kṣatra m S A man of the second or military and regal class: also n that class.
 पु. १ चार वर्णांतील दुसर्‍या म्हणजे क्षत्रिय वर्णाचा पुरुष . २ योध्दा ; वीरपुरुष . - न . क्षत्रिय जात . कर्म गा नैसर्गिक । क्षत्र जातीसी । - ज्ञा १८ . ८७८ . [ सं . ] क्षत्रिय - पु . १ क्षत्र अर्थ १ पहा . ब्राह्मण साहाय्यकर क्षत्रिय जो तोचि संत तोचि तरे । - मोआदि ३१ . ५६ . २ दुय्यम प्रत , थोडीसी हलकी प्रत दाखविण्यासाठीं कांहीं शब्दांच्या पूर्वी योजावयाचा शब्द . उदा० क्षत्रिय हिरा = जरा कमी तेजाचा ; पहिल्या प्रतीचा नव्हे असा हिरा . [ सं . ] क्षत्री - पु . ( क्षत्रिय शब्दाचा अपभ्रंश ) क्षत्रिय ; खत्री . तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । - ज्ञा ९ . ४६० . क्षत्रियांतक - पु . परशुराम . [ क्षत्रिय + अंतक ]
A man of the military and regal class.
  That class.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP