Dictionaries | References
क्ष

क्षय

ना.  झीज , नाश , लय , लोप ( हळूहळू );
ना.  अपकर्ष , अवनती , उतरती कळा , र्‍हास .
Waste, decline, decay, consumption. Pr. सुखानें पुण्याचा क्षय दुःखानें पापाचा क्षय. 2 Destruction, extinction, annihilation, loss, cessation of being or of present good quality. Ex. of comp. पापक्षय, पुण्यक्षय, कुलक्षय, धर्मक्षय, राज्यक्षय. 3 Consumption, Phthisis pulmonalis. 4 Decrease of the digits of the sun or moon. 5 A destruction of the universe. 6 In algebra. Negative quantity, minus: opp. to वृद्धि.
 पु. १ झीज ; र्‍हास ; अवनति ; नाश . म्ह० सुखानें पुण्याचा क्षय दुःखानें पापाचा क्षय . २ नायनाट ; लय ; नाश ; तोटा ; अस्तित्व नाहींसें होणें ; लोप . पाप - पुण्य - कुल - धर्म - राज्य - क्षय . ३ एक रोग ; शारीरिक र्‍हास ; राजक्ष्मा . ४ सूर्य , चंद्र यांच्या बिंबाचा र्‍हास ; तिथिक्षय . ५ पृथ्वीप्रळय ; लय . ६ ( बीजगणित ) ऋणसंख्या - याच्या उलट वृध्दि - धन - संख्या . ७ साठ संवत्सरांपैकीं शेवटचें संवत्सर . ८ सूर्योदयानंतर प्रवृत्त जे तिथि , नक्षत्र , योग इ० दुसर्‍या सूर्योदयापूर्वी संपणें . तिथिक्षय . [ सं .]
०कार   पु कफक्षय ; क्षयरोगांतील खोकला .
०गामी वि.  र्‍हास पावणारा ; उत्तरोत्तर खालावलेला ; मृत्युपंथास लागलेला . याच्या उलट वृध्दिगामी .
०तिथि  स्त्री. १ आज सूर्योदयानंतर सुरू झालेली व उद्यां सूर्योदयापूर्वी संपणारी चांद्रमानांतील तिथि ; सूर्योदयीं नसणारी तिथि . २ मृत माणसाची महिन्याची किंवा वर्षाची मृत्युतिथि , दिवस ( चांद्रमानाची ).
०दिवस  पु. क्षयतिथि .
०पक्ष  पु. दर महिन्यांतील दुसरा पंधरवडा ; वद्यपक्ष ; कृष्णपक्ष .
०मास  पु. ज्या महिन्यांत येतो . इतर महिन्यांत येत नाहीं . - ज्योतिषसार ७ .
०रोग  पु. राजयक्ष्मा ; रोगराज यानें शरीरांतील सर्व धातू उत्तरोत्तर क्षीण होऊन मृत्यु येतो ; हा असाध्य मानतात .
०रोगी वि.  वरील रोग झालेला .
०वृध्दि  स्त्री. १ र्‍हास - उत्कर्ष ; उतरती - वाढती कळा ; कमतरता - बढती ; कमी होणें - वाढणें . २ ( बीजगणित ) ऋणवृध्दिसंख्या ; उणें - अधिक संख्या .
०सूतक  न. ( काव्य ) मृताशौच ; अशौच . क्षयाह - पु . क्षयतिथि अर्थ २ पहा . क्षयिष्णु - वि . नश्वर ; अशाश्वत ; नाश पावणारें ; र्‍हास पावण्याजोगें . क्षयी - वि . १ क्षयिष्णु . २ क्षयरोगी .
n.  (सू. इ. भविष्य.) वायुमत में बृहत्क्षय का पुत्र ।
 m  Consumption. Destruction. Minus in algebra.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP