Dictionaries | References
क्ष

क्षर

kṣara a S That drops, oozes, or wastes away.
 पु. १ सृष्टींतील सर्व नाशवंत पदार्थ . - गीर १४१ २ सर्व भूतें . तेथ क्षराक्षर अरणी दोन्ही । गुरुमंत्रें दृढ मंथुनी । - एभा १९ . ७४ . [ सं . ] - वि . १ गळणारें ; ठिबकणारें ; झिरपणारें . २ झिजणारें ; र्‍हास पावणारें . ३ नाशवंत अशाश्वत . क्षरण - न . १ गळती ; झिरपा ; ठिबकणी . अधोद्वारीं दोही । क्षरणें तेंचि । - माज्ञा १८ . ३३५ . ( पाठ ). २ हळूहळू नाश ; र्‍हास . क्षरणें - अक्रि . पाझरणें ; ठिबकणें ; गळणें ; झिरपणें ; हळू हळू नाहीसें होणें . क्षराक्षरविचार - पु . ( तत्त्वज्ञान ) शरीर व मन यांचा क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार झाल्यावर मग त्यांतून जें तत्त्व निष्पन्न होतें तें आणि आपल्या भोंवती जी दृश्य सृष्टि - ब्रह्मांड आहे तिच्या निरीक्षणानें जें तत्त्व निष्पन्न होतें तें , मिळून दोन्ही एकच कां भिन्न आहेत याचें परीक्षण करणें . - गीर १४१ . क्षरित - वि . १ गळलेलें ; ठिबकलेलें . २ गाळलेलें . क्षारित - वि . पाझरविलेलें ; ठिबकविलेलें .
  That drops, oozes, or wastes away.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP