Dictionaries | References

गुण

See also :
GUṆA
ना.  अंक , मार्क ( परीक्षा ):
ना.  गुणधर्म ( पदार्थ ), मनोधर्म , लक्षण ;
ना.  तत्त्व , तेज ;
ना.  परिणाम , प्रभाव ;
ना.  कला , विद्या .
. गुण उधळणें-पसरणें-पागळणें g. of s. To have one's native vileness breaking forth; to manifest one's evil qualities; to show the cloven hoof. गुण करणें To make promise of future ability or cleverness--a child. गुण काढणें g. of o. To take the vice out of; to thrash soundly. गुण दाखविणें or गुणांवर येणें To drop the mask; to show the cloven hoof; to exhibit the real disposition. गुण शिकविणें To teach, i. e. to render intelligent by a sound beating. गुण सोडणें or विसरणें To leave the path of virtue and take to evil courses. गुणाची चहा करणें To love merit. गुणा- ची चहा होणें in. con. To have a love for excellencies or good qualities. गुणांची माती करणें To misapply and spoil virtues or talents. गुणास येणें or पडणें To succeed; to be effectual; to turn out well. चांगले गुण करणें To behave well.
 पु. १ मनोधर्म किंवा पदार्थाचा धर्म ; त्यांतील बल ; तेज ; सत्त्व ; अंत : स्थित धर्म ; विद्या , कला , सत्य , शौर्य इ० धर्म . एवं गुण लक्षण । - ज्ञा १७ . १३१ . २ ( न्यायशास्त्र ) रूप , रस , गंध , स्पर्श , संख्या , परिमाण , पृथकत्व , संयोग , विभाग , परत्व , अपरत्व , गुरुत्व , द्रवत्व , स्नेह , शब्द , बुध्दि , सुख , दु : ख , इच्छा , दोष , प्रयत्न , धर्म , अधर्म , संस्कार हे २४ धर्म . ३ सृष्टा , उत्पन्न केलेल्या वस्तूंचा धर्म . हे गुण तीन आहेत ; सत्व , रज , तम . हे ब्रह्मा , विष्णु . शिव यांचें अनुक्रमें लक्षण दर्शवितात . गुणीं देवां त्रयी लाविली - ज्ञा १८ . ८१७ . ४ उत्कृष्टता ; योग्यता ; व्यंगापासून अलिप्तता ; निर्दोषता . ५ उपयोग ; फायदा ; नफा ; फल ; लाभ . ६ निघालेलें फल , वस्तु , परिणाम , निपज ; उत्पन्न . ७ ( अंकगणित ) गुणून आलेलें फळ ; गुणाकार . ८ दोरी ; रज्जू . हें कर्माचे गुणीं गुंथलें । - ज्ञा १३ . ११०२ . मुक्तमोती लगसंपूर्ण । गुणेविण लेइलासे ॥ - एरुस्व १ . ३९ . ९ प्रत्यंचा ; धनुष्याची दोरी . गेला लक्ष्मण किष्किंधेतें गुण जोडुनि चापातें । - मोरामा १ . ५११ . १० ( समासांत ) - पट ; प्रमाण ; गुणाकार . जसें - अष्टगुण = आठपट ; सप्तगुण , इ० . शतकोटिगुणें तदधिक गमला शर निकर विखरितां पार्थ । - मोभीष्म ३ . ५६ . ११ उतार ; कमीपणा ( रोगाचा ). १२ ( अंकगणित ) गुणक . १३ ( भूमिति ) वर्तुळखंडाची ज्या . १४ दिव्याची वात . पै गुणुतेतुला खाय । - ज्ञा १३ . ७१९ . १५ परीक्षा उतरण्यासाठीं ठरविण्यांत आलेले संख्यांक ; ( इं . ) मार्क . १६ ( व्याक . ) संधि करतांना वगैरे स्वराच्या रूपांत होणारा फेरफार . [ इचा ए , उचा ओ , ऋचा अर , लृचा अल ] १७ वधुवरांचें घटित पाहण्याचे अंक . हे ३६ असतात . १८ ( ल . ) रोग ; व्याधि . म्ह० अठरा गुणांचा खडोबा . १९ प्रभाव ; परिणाम . संपत्ति हें एका तर्‍हेचें मद्य आहे , तें आपला गुण केल्याखेरीज बहुधा सोडणार नाहीं . - नि ५३ . [ सं . ] ( वाप्र . )
०आठविणें   ( मृत , गैरहजर मनुष्याच्या ) चांगल्या गोष्टी स्मरणें ; त्यांचा उल्लेख करणें .
०उधळणें   पसरणें पाघळणें - स्वाभाविक वाईट , दुष्ट स्वभाव बाहेर पडणें ; वाईट गुणांचें आविष्करण करणें . पत्र पुरतें झाल्यावर सदाशिवराव म्हणाले हे आपल्या मातोश्रींनीं कसे गुण उधळले पहा । - रंगराव .
०काढणें   १ दुर्गुण काढून टाकणें . २ यथेच्छ झोडपणें . बोलाचालीनंतर त्यांचे गुण चांगलेच बाहेर काढले .
०घेणें   देणें - पिशाचादि बाधा न व्हावी म्हणून देवादिकांपासून कौल घेणें , देणें .
०दाखविणें   गुणावर येणें - खरा स्वभाव दाखविणें .
०शिकविणें   मारून शहाणा करणें ; गुण काढणें
०सोडणें   विसरणें - सन्मार्ग सोडून वाईट मार्गास लागणें . गुणाची चहा करणें होणें - सदगुणावर प्रीति करणें , असणें ; चांगल्या गोष्टींचा सन्मान करणें . गुणाची माती करणें - सदगुणांचा , बुध्दीचा दुरुपयोग करणें ; अंगच्या चांगल्या गोष्टी , बुध्दि नासणें . गुणा येणें - सगुण होणें . गुणा आला विटेवरी । पीतांबर धारी सुंदर जो । - तुगा ७ . गुणास येणें पडणें - १ लागू होणें ; फळणें ; इष्ट परिणाम होणें . २ चांगल्या रीतीनें वागणें . म्ह० १ ढवळया शेजारीं बांधला पोंवळा वाण नाहीं पण गुण लागला . २ गुणा ; पूजास्थानम । = गुणामुळें माणसाला आदर प्राप्त होतो ; जेथें गुण तेथें आदर . सामाशब्द - गुणक गुणकांक - पु . ( गणित ) ज्या संख्येनें गुणतात ती संख्या . गुणक - वि . १ हिशेब ठेवणारा ; गणना करणारा . २ मध्य गुणक ; विशिष्ट शक्तीचें , गुणाचें मान दाखविणारा वर्ण , जात . [ सं . ]
०कथा  स्त्री. १ ईश्वराच्या गुणांचें कीर्तन , प्रशंसन . गुणकथा श्रवणादि साधनें । करुनि सेवटीं आत्मनिवेदन . २ ( सामा . ) गुण , ईश्वरी देणगी , स्वधर्म इ० विषयीं स्तुति . गुणकप्रमाण - न . ( गणित ) गुणाकारानें वाढणारें संख्येचें प्रमाण . १ . ४ . ८ . १६ . इ० प्रमाण ; ( इं . ) रेशिओ .
०कर   कारक कारी गुणकारीक - वि . ( अशुध्द ) १ गुणावह ; गुण करणारें , देणारें . २ परिणामी ; प्रभावी . गुण गुणकर - वि . ( काव्य ) गुणसंपन्न ; बुध्दि , सुलक्षण , सदगुण यांनीं युक्त ( मूल ).
०गंभीर वि.  चांगल्या गुणांनीं युक्त . उदारधीर गुणगंभीर । [ सं . ]
०गहिना  स्त्री. गुणवती व रूपवती स्त्री . जेव्हां जिवाला वाटेल तुमच्या आतां पाहिजे गुणगहिना । - सला ६ .
०गान   गाणें - न . गुणांचें स्तवन , गायन , प्रशंसा , प्रशस्ति ; गुणकथा . [ सं . ]
०ग्रहण  न. गुण ओळाखणें ; गुणाची चहा ; गुणीजनांचा परमर्ष , आदर करणें - उमगणें . [ सां . ]
०ग्राम   निधि पात्र राशि सागर गुणासर गुणाची रास खाण - वि . सर्वगुणसंपन्न ; सुलक्षणी ; सदगुणी ; अनेककलाकोविद .
०ग्राहक   ग्राही - वि . गुणांचा भोक्ता , चहाता ; गुणांचें चीज करणारा ; गुण ग्रहण करणारा ; दुसर्‍याचे गुण ओळखून संतोष मानणारा . [ सं . ]
०घाती वि.  गुणदूषक ; निंदक ; हेटाळणी करणारा . [ सं . ]
०ठेली  स्त्री. गुणांची थैली ; गुणखनि . सुतारुण्यें तारुण्य गुणठेली । - आपू १० . [ सं . गुण + स्था - थैली ]
०गुणत   क्रिवि . गुणाप्रमाणें ; गुणानुरोधानें . [ सं . ]
  क्रिवि . गुणाप्रमाणें ; गुणानुरोधानें . [ सं . ]
०त्रयविरहित वि.  वरील तीनहि गुणांविरहित असा ( ईश्वर ); निर्गुण . गुणत्रयविरहित अगम्य तूं । [ सं . ]
०दोष   पुअव . चांगले वाईट गुणधर्म ; सुलक्षणें आणि कुलक्षणें . नको माझे कांहीं । गुणदोष घालू ठायीं ।
०दोषपरीक्षा  स्त्री. गुणदोषांची चौकशी , छाननी , तपास .
०धर्म  पु. गुणलक्षण , स्वभाव ( बरा किंवा वाईट ; गुण अर्थ १ पहा . गुणन - न . १ गुणाकार ; मोजणी ; गणना . गुणनिधान , निधी - न . गुणांचा साठा ; गुणग्राम पहा . त्याची कन्या चिद्रत्न लावण्यागुणें गुणनिधान । - एरुस्व ३ . ४६ . गुणनीय - वि . गणण्यास , गुणण्यास योग्य .
०पंचक  न. आधिभौतिक वस्तूंचा मूळभूत पांच गुणांचा समाहार ( पृथ्वी , आप , तेज , वायु व आकाश , किंवा शब्द , रूप , रस , गंध व स्पर्श ). गुण पंचकें धरित्री आथिली ।
०परिणाम  पु. मूळ वस्तूचें तात्त्विक स्वरूप कायम राहून त्यास दुसरें नांव - रूप प्राप्त होणें . उदा० काथ्याची दोरी होणें , दुधाचें दहीं होणें - गीर २३९ .
०परिणामवाद  पु. त्रिगुणात्मक प्रकृतींतील गुणांच्या विकासानें किंवा परिणामानें व्यक्त सृष्टि निर्माण होते असें मत ( सांख्य मत ). - गीर २३८ .
०भूत वि.  १ गौण ; दुय्यम प्रतीचें . २ वरून , पासून निघणारें ; अनुकल्पित .
०माया  स्त्री. त्रिगुणांनीं युक्त असलेली माया . मुळीं झाली तें मूळ माया । त्रिगुण झाले ते गुणमाया । - दा ११ . १ . ९ . - भज ३५ .
०वचन   वाचक - न . गुण दाखविणारें वचन , शब्द , विशेषण .
०वंत   वान - वि . गुणसंपन्न .
०विशेषण  न. ( व्या . ) विशेषणाचा एक प्रकार ; हा नामाचे गुण दाखवितो .
०वेल्हाळ   वेल्हाळी - विपुस्त्री . ( काव्य . ) गुणांनीं आकर्षिलेला , आकर्षिलेली ; मोहित ; परितुष्ट .
०वेषम्य  न. गुणत्रयांचें ( सत्व - रज - तम ) विषम मिश्रण . याच्या उलट गुणसाम्य .
०सुशीळ वि.  ( काव्य . ) गुणी व शीलवान ; चांगल्या गुणांचा , स्वभावाचा . पतिसेवे सदा अनुकूल । सत्य वचनीं गुणसुशीळ ।
०स्तुति  स्त्री. गुणांची प्रशंसा .
०हीन वि.  १ गुणविरहित ; गुणाशिवाय . २ दुर्गुणी .
०क्षोभणी   क्षोभिणी माया - स्त्री . माया ; त्रिगुणाची साम्यावस्था मोडणारी ( माया ); मूळ मायेंतील गुप्त असलेले त्रिगुण जेव्हां स्पष्ट होतात तेव्हां तिला गुणक्षोभिणी म्हणतात . पष्ट होती संधी चतुरी । जाणावी गुणक्षोभिणी । - दा ९ . ६ . ६ . गुणज्ञ - वि . गुणग्राहक . जाणता ( विद्यादि गुणांचा ) पहा . गुणांक - पु . ( गणित ) गुणाकार . गुणांकभागोत्री - स्त्री . १ गुणाकार व भागाकार . २ ( व्यापक ) अंकगणित ; गणित . तुझा पंतोजी कांहीं गुणांकभागोत्री शिकवतो कीं नाहीं ? गुणाकार - पु . १ गुणांक ; गुणनाचें फळ ; गणिताचा एक प्रकार ; गुणकांकाने गुण्यांकास गुणणें . याचे कांहीं प्रकार :- कोष्टकी - धांवरा - बैठा - विविध गुणाकार इ० कपटसिंधु पहा . २ गुणणें ; गुणाकार करणें . [ सं . गुण ; म . गुणणें ] गुणा गुणाकारक गुणाकारी - वि . गुणकारक - कारी पहा . गुणागुण - पु . गुण आणि अवगुण ; गुणदोष . गुणाचा - वि . भलेपणा , चांगले गुण अंगीं असणारा ; विविध गुणांचा . गुणांचें गुणपात्र लेंकरू - न . ( ल . उप . ) अट्टल लुच्चा ; लबाड ; सोदा . गुणाचें गुणपात्र हातीं फुलपात्र . गुणाढय - वि . १ गुणसंपन्न . २ एक प्रसिध्द कवि . बृहत्कथेचा कर्ता . [ सं . ] गुणातीत - व . गुणविरहित ; निर्गुण . ( ईश्वर ) गुणानुवाद - पु . गुणांची वाखाणणी ; गुणकीर्तन ; प्रशंसा . गणानुवादकीर्तन - न . गुणांचें स्तवन . गुणावह - वि . गुण देणारें ; गुणकारक ; परिणामी ; प्रभावी ( औषध वगैरे ). गुणांश - पु . १ गुणकारीपणा ; प्रभाव ; सुपरिणाम . हा जें औषध सांगतो त्याचा गुणांश केवढा ? २ परिणाम ; फळ ; यश . त्या औषधानें अद्यापि गुणांश आला नाहीं . गुणित - वि . ( गणित ) गुणलेलें . गुणेंगोविंदें गुण्यागोविंदें गुणेंगोविंदानें गुण्यागोविंदानें - क्रिवि . १ शांततेनें ; भांडणतंटा न करितां ; मुकाटयानें ; आनंदानें ; स्वेच्छेनें . पक्षीही लहान । घरटीं बांधुन । गुण्यागोविंदानें मला दहा वेळ पलंगावर पालवा । - प्रला ३ चांगल्या प्रकारानें , रीतीनें . गुणोत्कर्ष - पु . गुणांचें वैपुल्य , विकास , वाढ . गुणोत्कीर्तन - न . गुणांचें कीर्तन ; गुणानुवाद ; प्रशंसा . गुणोत्तर - न . ( गणित ) संख्यांची , दोन परिमाणांची पट , हिस्सा , प्रमाण ; भूमितिश्रेणींतील पदांमधील गुणोत्तर निघतें गुण्य - क्रि . १ जिला गुणावयाचें ती संख्या . २ गुणण्यास , गणण्यास योग्य . [ सं . गुण = मोजणें ] गुण्यांक - पु . गुण्य संख्या .
गुण आठविणें
मृत अथवा गैरहजर मनुष्‍यासंबंधीच्या चांगल्‍या गोष्‍टीचे स्‍मरण करणें.
 m  A quality, attribute, property; a power, faculty. Excellence, merit, virtue. Benefit, advantage, good. A rope, cord. In comp. Multiplied by, fold; expressing the ratio; as अष्टगुण. Remission or abatement (of a disease).
गुण अडविणें   Commemorate the virtues, merits, &c.
गुण उधळणें-पागळणें   Have one's native vileness breaking forth. Manifest one's evil qualities.
गुण दाखविणें, गुणांवर येणें   Drop the mask, show the cloven hoof, exhibit the real disposition of.
गुणाची चहा करणें   Love merit.
गुणाची चहा होणें   Have a love for excellencies or good qualities.
गुणांची माती करणें   Misapply and spoil virtues or talents.
गुणास येणें, पडणें   Succeed, be effectual, turn out well.

Related Words

गुण   गुण   षड् गुण   घटकेचा गुण   सहा गुण   गुणापसून गुण उत्‍पन्न होतात   धारजिण गुण   नऊ गुण   गुण उधळणे   गुण शिकविणें   दुसर्‍यागेले सोदी गुण, आपणागेले पळे अवगुण   दैव-उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   गुण काढणें   गुण उधळणें-पसरणें-पाघळणें   गुण घेणें   जे गुण बापाचे, ते गुण पोराचे   जो गुण बाळा, तो गुण जन्मकाळा   गुण करणें   पांचीं गुण तो पन्नाशीं गुण   ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला-लागतो   जे गुण बाळे, ते गुण लेंकुरवाळे   शेटीचोय गुण आनी काना चोय गुण   कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   आपले गुण पाघळणें   ती गुण   ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला   गुण गेला पण वाण राहिला   गुण दाखविणें   उपजत गुण   घटकेचा गुण   दैव-उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   धारजिण गुण   पाटलाची सून, वडारणीचे गुण   वेळेचा गुण   षड् गुण   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   निर्गुण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.