Dictionaries | References

गुरु

See also:  GURU
ना.  अध्यापक , आर्चाय , गुरुजी , बृहस्पती , मंत्र देणारा , मास्तर , विद्यादानी , शिक्षक ;
ना.  जड , मोठा , लठ्ठ , वजनदार .
One who prompts, puts up to, abets. 3 A father or any venerable male relation. 4 A name of बृहस्पति, the Guru of the gods and Regent of the planet Jupiter. 5 The planet Jupiter. 6 A pimple of the small-pox inflamed by scratching.
Heavy or weighty. 2 Great or large. 3 Heavy of digestion. 4 Long; having a sound equal to two mátrá or simple sounds--a vowel. 5 Difficult, arduous, hard. 6 Honorable, venerable, reverend.
वि.  १ जड ; लठ्ठ ; वजनदार . २ मोठा विस्तृत . हा गुरु मार्गुय गा । - गीता १३ . २२२ . ३ पचण्यास जड . ( पदार्थ ). ४ दीर्घ ; द्विमात्र ( स्वर ). ५ कठिण ; अवघड ; भारी ( वस्तु ). ६ आदरणीय ; मान्य ; पूज्य . सामाशब्द -
 पु. १ मंत्रोपदेशक . २ धार्मिक उपाध्याय . धार्मिक संस्कार इ० करणारा . ३ उपनयन संस्कारामध्यें गायत्र्युपदेश करणारा . ४ शास्त्रें इ० शिकविणारा ; विद्यादाता . सकोप दिसती गुरु क्षणभरीच जे तापले । - केका ८८ . ( यावरून ) ५ ( ल . निंदार्थी ) फूस , भर , प्रोत्साहन देणारा वाईट मसलत देणारा माणूस . ६ पिता ; बाप ; पूज्य , वडील माणूस . गाति जनमेजया तव गुरुच्या आश्चर्य मरण जननाचें । - मोअश्व ४ . ८० . ७ या नांवाचा ग्रह . ८ बृहस्पति ; देवांचा गुरु . वृत्रारिप्रति वदला गुरु ज्या या भद्रधामनीतीतें । - मोसभा ६ . ७० . ( सामा . ) शिक्षक ; मास्तर ; आचार्य . ९ - संबोधन . अहो । लब्धप्रतिष्ठित ; बोवाजी ! म्ह० गुरूची विद्या गुरूस फळली - भोंवली = लोकांस फसविण्याची युक्ति ज्याला शिकविली त्यानेंच याला ( शिकविणाराला ) फसविलें . सामाशब्द -
 पु. सूर्यमालेंतील सर्वांत मोठा ग्रह ; गुरु अर्थ ५ पहा . दर तेरा महिन्यास एक राशि अशी याची गति आहे . याच्या अस्ताचा काल मंगलकार्यास वर्ज्य मानितात . गुरु सिंह राशींत असला म्हणजे सिंहस्थ व कन्याराशीस असला म्हणजे त्यास कन्यागत म्हणतात .
 पु. ( संगीत ) दोन मात्रांचा काल .
०पुष्ययोग  पु. एक चांगला योग . गुरवारीं पुष्य नक्षत्र आलें असतां त्या योगास म्हणतात . हा अमृतसिध्दि योग होय .
०घंटाळ वि.  ( कों . ) अवडंबर माजविणारी . गुरुत्व - न . १ ( यंत्रशास्त्र ) पृथ्वीच्या मध्याकडे पडण्याचा पदार्थाचा कल . २ जडत्व ; वजन . ३ मोठेपणा ; थोरपणा . तोषेचिना शाडर्गधरु । गुरुत्वासीं । - ज्ञा १६ . २६ . ४ गुरुपणा . गुरुत्वमध्य - पु . गुरुत्वाकर्षणाचा मध्यबिंदु ; ज्या बिंदूसभोंवतीं पदार्थाच्या सर्व भागांचें कोणत्याहि स्थितींत समतोलन होतें तो बिंदु . गुरुत्वशून्य - वि . मुळींच वजन नसलेलें . गुरुत्वाकर्षण - न . विश्वांतील वस्तूंचें परस्पराकर्षण ; एक जड पदार्थ दुसर्‍याला आपणाकडे ओढतो अशी स्थिति ; पृथ्वीमध्याकडे ओढण्याची शक्ति . गुरुलघुविचार - पु . १ बोलण्यांत , लिहिण्यांत र्‍हस्वदीर्घ स्वरांचा काळजीपूर्वक विचार ; र्‍हस्वदीर्घाकडे लक्ष . २ बारीक , खोल विचार ; सर्व बाजूंनीं विचार .
०किल्ली  स्त्री. १ न . समजणारें , खोल , गूढ लिखाण , प्रबंध , मंत्र ( गुरूनें सांगितल्याखेरीज न समजणारें ). २ ( सामा . ) गूढ ; कठिण गोष्ट , शंका . ३ खुबी ; मख्खी ; मर्म ( कुलंगडयाचें ); गूढ उकलण्याची युक्ति . प्रकरण जरा जड आहे , पण तुझ्यापासून तिला नरम करण्याची गुरूकिल्ली आतां शिकलोंच आहे . - त्राटिका [ गुरु + किल्ली = फक्त गुरूलाच चालवितां येणारी किल्ली ]
०बल  न. स्वराशीस या ग्रहाचें आनुकूल्य असणें . जन्मलग्नकुंडलींत हा ग्रह दोन , पांच , सात , नऊ , यास्थानीं असलेला शुभ मानितात व या कालीं गुरुबल आहे असें मानितात .
०कुल  न. गुरूचें कुटुंब . २ गुरूनें विद्यार्थ्यांना पुत्रवत मानून , त्यांचे खाणें , पिणें , विद्याभ्यास इ० सर्व सोय लावणारी पाठशाळा ; प्राचीन आश्रम पध्दति . [ सं . ]
०वती वि.  महत्व ; मोठेपणा ; विस्तार . ग्रंथ गुरुवतीचा ठावो । - ज्ञा १ . ३३ . गुरुवी - वि . थोर ; मोठा ; श्रेष्ठ . अर्जुना हे गुरुवी भक्ती । - ज्ञा ९ . २२८ . गुरुवृत्त - न . मोठें वर्तुल , मंडळ .
०कृपा  स्त्री. गुरूची मर्जी , आशीर्वाद . गुरुकृपा संपादन केली असतां विद्या लवकर येते .
०वार  पु. बृहस्पतीचा वार ; ( रविवारापासून ) आठवडयांतील पांचवा दिवस ; बृहस्पतवार .
०क्रम  पु. गुरुपरंपरागत , अधिकृत शिक्षण . [ सं . ]
०गम्य वि.  ज्याच्या समजुतीस गुरु लागतो असें ; गुरुकिल्ली लागणारें ; दुर्बोध ; गहन ( श्लोक , वचन ग्रंथभाग ). गम्य पहा . कां गुरुगम्य हन ठाय । - ज्ञा ६ . ४५९ . [ सं . ]
०जन  पु. पूज्य , माननीय व्यक्ति ; वडील माणसें . कशि गुरुजनीं सतीची शिवला ज्या कुमुदिनीस असदर्क । - मोसंशयरत्नमाला १३ . ( नवनीत पृ . ३५० ). वडीलधारीं माणसें ; मानाची मंडळी .
०जनसभा  स्त्री. १ ( ख्रि . ) युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडियाच्या एका विशिष्ट क्षेत्रांतील चर्चेसच्या आचार्य व प्रातिनिधिक वडिलांची सभा . २ इंग्लंडचे चर्चच्या एखाद्या पांढरीच्या आचार्याची व मंडळीच्या अनेक कामांत त्याची मदत करणारांची प्रातिनिधिक सभा . हे सहाय्यक वडीलच असे नाहीं . गुरुजी - पु . गुरु ; शिक्षक ; आचार्य ; पुरोहित . गुरुतलपग , गुरुतलपी - पु . १ गुरुपत्नीशीं गमन करणारा . २ ( ल . ) मातेसमान स्त्रीपाशीं गमन करणारा ; महापापी ; नीच . [ सं . गुरु + तल्प + ग ]
०दक्षिणा  स्त्री. विद्या संपल्यानंतर शिष्याने गुरूस द्यावयाची देणगी , संभावना ; शिकण्याची फी . [ सं . ]
०द्रव्य  न. आपल्या गुरूची मालमत्ता . ( समासांत ) गुरुद्रव्यहरण - साधन - अपहार - अभिलाष . [ सं . ]
०द्रोह  पु. गुरूचा द्वेष ; गुरूचा गुन्हा करणें ; गुरूचा विश्वासघात . [ सं . ]
०द्रोही वि.  गुरूचा द्बेष करणारा ; गुरूशी वैर करणारा . मित्रद्रोही गुरुद्रोही । विश्वद्रोही देवद्रोही । [ सं . ]
०द्वार  न. शीखांच्या गुरूंनीं स्थापन केलेलें देऊळ . ( सामा . ) शिखांचे देऊळ .
०परंपरा  स्त्री. आपला गुरु , गुरूचा गुरु , त्याचा गुरु असा गुरूचा वंश .
०पीठ  न. गुरूचें राहण्याचें ठिकाण ; गुरूची गादी . [ सं . ]
०पुत्र  पु. १ गुरूचा मुलगा . २ साधुसंतांमध्ये वाढलेला व त्यांच्याप्रमाणें वागणारा ; सत्पुरुषानें उपदेश केलेला ; साधु ; शिष्य . [ सं . ]
०पुरुष  पु. नवरा ; पति . व्रतोपवास करावा । गुरुपुरुष निरोपानें । - गुच ३५ . ८७ . [ सं . ]
०पूजा  स्त्री. १ कार्यारंभीं राशीस प्रतिकूल असल्यास करावयाची बृहस्पतीची पूजा . २ स्वगुरूची पूजा .
०पौर्णिमा  स्त्री. आषाढी पौर्णिमा , यादिवशीं आपला मंत्रोपदेशक गुरु , संन्यासी इ० ची पूजा करतात . [ सं . ]
०प्रचीति  स्त्री. १ गुरूची पारख , गुणदोष परीक्षा . २ गुरूचा अनुभव ( बरा - वाईट ) येणें . [ सं . प्रतीति ]
०प्रसाद  पु. १ गुरूची कृपा . २ गुरूच्या आशीर्वादाचें फल ( विद्या , कौशल्य , भरभराट इ० ). ३ ( ल . ) भांग ; अफू ; तंबाखु . [ सं . ]
०बंधु  पु. १ एकाच गुरूचे दोन किंवा अनेक शिष्य , ते परस्पर . २ सहा ध्यायी . ३ स्वत : च्या गुरूचा पुत्र . [ सं . ]
०मंडली   गुरु करणें . ( महारांच्या जातींत ) - बदलापूर १७५ .
०मंत्र  पु. १ गुरूनें सांगितलेला धार्मिक उपदेश ; गुरूनें उपदेशिलेला मंत्र . २ ( ल . ) बरीवाईट सल्ला , मसलत ; गुप्त शिकवण ( बहुतेक वाईट अर्थानें . ) ( क्रि० देणें ; शिकविणें ; सांगणें ; म्हणणें ). [ सं . ]
०मार्ग  पु. गुरूनें उपदेशिलेल्या मंत्रासंबंधीं जपादि विधि . [ सं . ]
०मुख  न. अध्ययनाच्या प्रसंगीं गुरूच्या मुखांतून वाक्य निघणें ; प्रत्यक्ष गुरूचा उपदेश , शिकवण , ही माझी विद्या ऐकीव आहे , हिला गुरुमुख नाहीं . [ सं . ]
०शाप  पु. गुरूनें रागानें काढलेलें वचन ; गुरूनें दिलेला शाप . [ सं . ]
०शिक्षा  स्त्री. १ अभ्यासाविषयीं गुरूनें लावून दिलेले नियम ; गुरूची शिकवण . २ नियम वगैरे मोडल्याबद्दल गुरूनें दिलेला मार . [ सं . ]
०संप्रदाय  पु. १ गुरुमार्ग पहा . २ विशिष्ट गुरूचे अनुयायी लोकांचा आचार , परंपरा वगैरे .
०संप्रदायी वि.  १ गुरुमार्गी . २ विशिष्ट गुरूचे अनुयायी ( लोक , जमाव , संघ ).
०स्मरण   कार्यास प्रारंभ करणें . गुरूपदेश , गुरोपदेश - पु . गुरूनें दिलेला मंत्र .
करणें   कार्यास प्रारंभ करणें . गुरूपदेश , गुरोपदेश - पु . गुरूनें दिलेला मंत्र .
n.  बृहस्पति का नामांतर । मरीचि प्रजापति की सुरुपा नामक पुत्री तथा अंगिरस की स्त्री । देवाचार्य बृहस्पति उसका पुत्र था । इसे ही गुरु कहते थी । यह महाबुद्धिमान तथा वेदवेदाङ्गपारंगत था [विष्णुधर्म. १. १०६]; बृहस्पति देखिये ।
मुका गुरु
न वाहणारा फोड.
 m  A spiritual parent. A religious teacher, one who instructs in the Shastras; a teacher gen. Hence (fig.) One who prompts, puts up to, abets. A father or any venerable relation.
गुरुची विद्या गुरुला फळली   Used where a man's evil counsel turns back against himself.
शिष्यापराधे गुरोर्दंडः   The Guru should be punished for the faults of his pupil.
  Heavy or weighty. Great or large. Difficult, arduous.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP