Dictionaries | References

चूक

 f  A mistake. A small nail.
 स्त्री. दोष ; चुकी ; अपराध ; गैरवाजवी कृत्य ; घडूं नये अशी गोष्ट ; गफलत ; हयगय ; भ्रम . [ चुकणें पहा . सं . च्युति ; हिं . चूक ]
 स्त्री. लहान खिळा .
०डाव  पु. सोंगटयांच्या खेळांत चुकीनें दिलेला डाव .
०दान  न. चुकीचें दान .
०भूल  स्त्री. नजरचुकीनें , विस्मरणानें राहिलेला , झालेला दोष , अशुध्द , व्यंग , दोष , कसर , न्यून इ० कांच्या अर्थाचा व्यापक शब्द . [ चूक + भूल = भ्रम , विस्मृति ] म्ह० चूक भूल द्यावी घ्यावी = हिशेबांत कांहीं बाबी चुकीच्या असल्यास किंवा कांहीं बाबी नजरचुकीनें दाखविल्या नसल्यास , लिहावयाच्या राहून गेल्या असल्यास देण्याघेण्यांत त्या दुरुस्त केल्या जाव्या . व्यवहारांत , देवघेवींत , व्यापारांत उभय पक्षांनीं एकमेकांस दोष कळवून देणें तें द्यावें व घेणें निघेल तें घ्यावें .
cūka f A mistake, blunder, fault, error. 2 A small nail, a tack.
ना.  कमतरता , त्रुटी ;
ना.  गफलत , हयगय , हेळसांड ;
ना.  अपराध , गुन्हा , दोष , प्रमाद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP