Dictionaries | References

छडी

A cane, ratan, switch. Pr. छडी कांहीं लागेना विद्या कांहीं येईना or छडीवर पड- ली सावली आम्हास विद्या पावली. 2 An ornamented cane or staff carried before great men.
 स्त्री. १ वेताची चमकी ; बारीक लांब काठी . २ चोबदाराच्या हातांतील चांदी - सोन्याची काठी . ३ वस्त्रांतील विशिष्ट रंगाची रेघ , ओळ , पट्टी . छडी जुन्नरी रंग नाना तरंगी । - किंकर द्रौपदी वस्त्रहरण ७९ . म्ह० छडी लागे छमछम विद्या येई घमघम , छडी कांहीं लागेना विद्या कांहीं येईना , छडीवर पडली सावली आम्हांस विद्या पावली .
०दार   बरदार - पु . चोबदार . - वि . छडीसारखें उभे पट्टे असलेलें ( कापड ).
०पट्टा  पु. दांडपट्टयासारखा काठी आणि फरीचा खेळ . [ सं . शर . हिं . छडछडी ]
छडी देई ज्ञान, तर गुरू कां फुंकी कान?
छडी मारून जर विद्या येती तर गुरूला कान फुंकण्याचे म्‍हणजे शिकवण्याचे परिश्रम कशाला पडते. छडी ही आनुषंगिक गोष्‍ट आहे. आनुषांगिक गोष्‍टीने जर कार्य साधते तर मुख्य गोष्‍टीची जरूर राहणार नाही, पण तसे होत नाही.
 f  A cane, rattan.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP