Dictionaries | References

टुकटुक

See also:  टुकटुकां
क्रि.वि.  आशेने पाहणे , उत्सुकतेने टक लावणे , लोभाने पाहणे ;
क्रि.वि.  अंधुकसा जळणे , मिणमिणणे ( दिवा );
क्रि.वि.  कशीतरी गुजराण करणे , गरिबीत राहणे , जेमतेम जगणे .
Wishfully, wistfully, earnestly--staring or looking at. 2 Flickeringly--a light burning. v कर. 3 Scantily, poorly, in the style of a morsel now and a morsel then--living. Ex. झुगझुग जिणें टु0 खाणें. टुकटुकवाणा बसणें To sit staring about vacantly.
क्रि.वि.  १ आशेनें , उत्सुकतेनें , लोभानें पहाणें ( दुर्मिळ वस्तूकडे ). २ मिणमिण ; अंधुकपणें ( दिवा जळणें ). ( क्रि० करणें ). ३ खुटुरुटुं ; गरीबीनें ; जेमतेम ( उपजीविका करणें ). [ घ्व . ] म्ह० झुगझुग जिणें टुकटुक खाणें .
०वाणा   फुकट टक लावून बसणें . टुकटुकणें - अक्रि . सोत्सुक पहाणें ; रोखून बघणें .
बसणें   फुकट टक लावून बसणें . टुकटुकणें - अक्रि . सोत्सुक पहाणें ; रोखून बघणें .
०दाखविणें   ( लहान मुलांत रूढ ) बोटानें वेडावणें ; वाकुल्या दाखविणें .
०माकड   टुकटुकावल्यो - ( लहान मुलांत रूढ ) आपण एखादा पदार्थ खात असतां वाकडया बोटानें दुसर्‍यास हिणविणें . टुकटुक माकड , आम्ही खाऊं पापड , तुला देऊं मेकड . टुकटुकाविणें - सक्रि . टुकटुकमाकड करणें .
टुकटुक दाखविणें
लहान मुले आपण खात असतां न खाणार्‍या दुसर्‍या मुलांस बोटे वाकडी करून वांकुल्‍या दाखवितात. बोटाने वेडावणें
वांकुल्‍या दाखविणें
हिणविणें.
ad   (Imit.) Wishfully, wistfully, earnestly-staring or looking at. Flickeringly-a light burning. Scantily, poorly in the style of a morsel now and a morsel then-living.
टुकटुकवाणा बसणें   To sit staring about vacantly.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP