Dictionaries | References

See also:  ṬA (थ)

ṭ The eleventh consonant, and the first of the class of palatals. It is sounded by a forcible application of the tip of the tongue to the palate; but as it can be represented by no letter of the Roman alphabet its exact power must be discovered by the ear. Its symbol in this work is T. See notice respecting ट & त under त. 2 Used as s m A blockhead or numskull. ट, फ, करीत वाचणें To read trippingly and blunderingly--a tyro or novice.
वर्णमालेंतील ११ वें आणि ट वर्गांतील १ लें अक्षर . याचा उच्चार जीभ टाळूला जोरानें लावून करावा लागतो . अक्षरविकास :- ञ प्रमाणेंच याच्या तीन काळच्या तीन अवस्था असून त्या ञ च्या ठिकाणींच सांपडतात . - पु . अक्षरशत्रु ; मूर्ख ; ढ . टफ करणें - ( ल . ) एखाद्या विषयाचें अल्पज्ञान होणें . विद्यालयांतून जे संस्कृतज्ञ बाहेर पडतात त्यांना ट फ करण्याचें सामर्थ्य आलें न आलें कीं लगेच कोणत्याही शास्त्रावर व्याख्यान , निबंध वगैरे सुरू झालेच - नि . टफ करीत वाचणें - अडखळत किंवा चुका करीत वाचणें ; एकेक अक्षर लावून वाचणें ( नवीन शिकणारा असें वाचतो ). ला जुळविणें - १ अक्षराला अक्षर जुळविणें . २ ( ल . ) हीन दर्जाचें काव्य , कविता करणें ; चांगला प्रतिभासंपन्न कवि नसणें . असे ढ पुढें येणार आहेत हें जर त्या कवीला माहीत असतें तर त्यानेंहि ट ला ट जुळविण्याचे श्रम घेतले नसते . - मूक .
The eleventh consonant.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP