Dictionaries | References

तुकणे

उ.क्रि.  ( ल . ) चिंतन अथवा विचार करणे .
अ.क्रि.  ( संमती अथवा ) रुकार देतांना मान डोलणे . यजनं करितां कौतुके । तेहि वेदांचा माथा तुके । - ज्ञा ९ . ३०८ . मान - माथा - मस्तक - शीर तुकणे . - सक्रि . हलविणे ; डोलविणे . अहो पुसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । - ज्ञा ११ . १७ . [ का . तूकु = डोलणे ; हालविणे ]
स.क्रि.  ( काव्य ) १ तोलणे ; वजन करणे . आता स्वप्नचि हे तुकले । साचासरिसे । - ज्ञा ४ . १ . तयाचे तुकी कोण ऐसा तुकावा । २ बरोबरी करणे ; समान , सारखा असणे . परब्रह्माचेनि पाडे तुके । - ज्ञा ६ . ९० .
( ल . ) अंदाज करणे ; किंमत करणे . परब्रह्मरुपी असा हा तुकावा । [ का . तूक ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP