Dictionaries | References

तुक

 स्त्री. ध्रुपदांच्या चार अवयवांची एकत्र संज्ञा .
 न. 
महत्त्व ; वजन ; योग्यता . तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तया चिया सद्भावा । - ज्ञा ९ . २६१ .
( काव्य . ) तोल ; जोख ; वजन . द्यावे संभाळूनी समतुक भावे । आपणहि खावे त्यांचे तुके । - तुगा ३१ .
तुलना ; बरोबरी . विप्रवर सुते क्षत्रिय उतरेल तुझ्या न हा ययाति तुकी । - मोआदि १० . ७० . [ का . तूक = वजन , योग्यता ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP