Dictionaries | References

भांडें

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 


 न. १ तोफ . २ गलबत ; नाव ; बोट ; तारूं . ३ बांधलेली विहिर असल्यास त्या विहिरींएंक पात्र .
 न. 
( धातु , माती , लांकूड ; दगड इ० चें ) पात्र ; पातेलें ; तपेली ; मडकें इ० .
( ल . ) तोफ . तैसींचि आत्मानुसंधानाचीं भांडीं । बुरुजोबुरुज ठेविलीं अति कडाडीं । - स्वादि १० . २ . ७ .
नदीचें पात्र .
प्रसूतीनंतर किंवा कांहीं रोगानें बाहेर येणारा जननेंद्रियाचा भाग ( विशेषतः पशूंचा ).
नगारा , पडघम इ० चें गंगाळ , पडगा .
( ना . व . ) दागिना ; अलंकार . मुलीच्या अंगावर पंचवीस तोळ्यांचीं भांडीं आहेत .
( व . ) शेतीच्या कामांतील वस्तु .
( व . ल . ) विहीर . [ सं . भांड ]
०फुटणें   
( ल . ) गुह्य फुटणें ; उघड होणें ; अब्रू जाणें .
( कु . ) पुष्कळ जुलाब होणें ; कोठा फुटणें .
०बाहेर   - प्रसूतिसमयीं पशु इ० च्या जननेंद्रियाचा भाग बाहेर येणें ; आंग बाहेर येणें ; भांडीं डागणें - तोफेस बत्ती लावणें . ... सदरसरनोबत , हवालदार यासीं बंदुकीचा व भांडीं डागायाचा अभ्यास असावा . - मराआ ३३ . भांड्याच्या तोंडीं , मुखीं उडविणें - तोफेच्या तोंडीं देऊन ठार मारणें . कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक । - दा ३ . ७ . ७२ . - शारो १९३ . भांड्यास भांडें लागणें - शेजार्‍याशेजार्‍यांत मतभेद , तंटे इ० होणें . भांडींकुंडीं - नअव . भांडीं व इतर संसारोपयोगी सामानसुमान ( समुच्चयानें ).
येणें   - प्रसूतिसमयीं पशु इ० च्या जननेंद्रियाचा भाग बाहेर येणें ; आंग बाहेर येणें ; भांडीं डागणें - तोफेस बत्ती लावणें . ... सदरसरनोबत , हवालदार यासीं बंदुकीचा व भांडीं डागायाचा अभ्यास असावा . - मराआ ३३ . भांड्याच्या तोंडीं , मुखीं उडविणें - तोफेच्या तोंडीं देऊन ठार मारणें . कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक । - दा ३ . ७ . ७२ . - शारो १९३ . भांड्यास भांडें लागणें - शेजार्‍याशेजार्‍यांत मतभेद , तंटे इ० होणें . भांडींकुंडीं - नअव . भांडीं व इतर संसारोपयोगी सामानसुमान ( समुच्चयानें ).

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  A vessel. Fig. A cannon. The bed of a river.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP