Dictionaries | References

रेकणे

See also:  रेंकणे
अ.क्रि.  
( म्हैस , रेडा इ० नी ) ओरडणे .
घोगर्‍या आवाजाने बोलणे ; गाणे ; मोठ्या , कर्कश शब्दाने बोलणे ; मोठ्याने हांक मारणे .
चरफडणे ; पिरपिरणे ; असंतुष्टपणाने ओरडणे . ( गो . ) रेक्यौंचे . [ रां . रेष = अव्यक्त शब्द करणे ] रेंकत - क्रिवि . हळू ; जडपणे ; आळसटपणाने ; आळसावत ; मंद गतीने ; ( क्रि० करणे , बोलणे , चालणे ). [ रेंगत याबद्दल वरील शब्द या वाक्प्रचारांत आलेला दिसतो . याशिवाय इतर ठिकाणी याअर्थी रेंकणे याचा उपयोग नाही ] रेंकत येणे - ( म्हैस अभिलाषाने ओरडत येते त्याप्रमाणे ) लालचीने , आपण होऊन येणे ; उत्सुकतेमुळे धांवत येणे . आम्हांस श्रीमंत होऊ द्या , मग कोण पाहिजे तो रेंकत येईल . रेंकाट्या , रेकाट्या - वि . म्हशीसारख्या आवाजाचा ; रेंकत बोलणारा ; घोगर्‍या आवाजाचा ; कर्कश आवज असलेला .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP