Dictionaries | References

विकार

ना.  अस्वस्थ , आजार , दुखणे , रोग ;
ना.  मनःक्षोभ , मनोविकार , विकृती .
Change of form or nature; alteration of the natural state; any modification or altered mode of being. Ex. दहीं हा दुधाचा वि0; वाफ, गारा हा जलाचा वि0; सुवर्णाचा वि0 अलंकार; मृत्तिकेचा वि0 घट. 2 Sickness, disease, disorder; any change from the state of health. 3 Passion, emotion, aroused feeling; any disturbance of the natural or quiescent condition of the soul. Ex. काम-क्रोध-लोभ-मोह-विकार, मनोविकार, मृव्दिकार.
 पु. १ विकृति ; बदल ; स्थित्यंतर ; पदार्थाचें रूपांतर किंवा बदललेलें रूप . दहीं हा दुधाचा विकार . वाफ , गारा हा जलाचा विकार . सुवर्णाचा विकार अलंकार . मृत्तिकेचा विकार घट . २ दुखणें ; व्याधि ; रोग ; अस्वास्थ्य . ३ भाव ; उत्थित भावना ( कामक्रोधादि ); क्षुब्ध मनोवृत्ति ; जीवाची स्वाभाविक , निश्चल स्थिति जाऊन आलेला कसलाहि क्षोभ . काम - क्रोध - लोभ - मोह - विकार , मनोविकार . तिहीं विरक्तीचि ज्वाला घेतली । तंव विकारांचीं इंधनें पळिपलीं । - ज्ञा ४ . १२९ . ४ विनाश . ब्रह्म याचा हेत भवानी सुंदर । अंगुष्ठें विकार आणियेला । - ब १२८ . ५ विस्तार . - हंको ५ . १३८ . ६ भेद ; निरनिराळा प्रकार . आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी । - ज्ञा १५ . ५२१ . ७ परिणाम . - ज्ञा १७ . ५९ . [ सं . ] विकारक , विकारी - वि . ( रसा , शाप . ) विकार करणारा . १ रासायनिक क्रिया घडवून आणणारा ; ( इं ) अ‍ॅक्टिनिक . २ ( तर्क . ) ज्यांची क्रिया दुसर्‍यावर घडते तें ; ( इं . ) एजंट . - न्यायप २९ . विकारणें - अक्रि . आकाराला येणें ; भिन्नरूप धारण करणें ; विकासणें . आतां वस्तुजातचि आघवें । मजपासूनि जाणावें । विकारलें असे । - ज्ञा ७ . ५२ . विकारवणें - सक्रि . विकारवश करणें . बहु प्रकारें विकारवावें , चित्त तयाचें तपोवित्त हळु जपुनि घ्यावें । - अमृत , शुकचरित्र २१ . विकारी - पु . साठ संवत्सरांपैकीं तेहती सावा संवत्सर . - वि . विकारयुक्त ; दुखणेकरी ; आजारी ; ( रोगानें किंवा मानसिक क्षोभानें ) पीडिलेला . ३ विकार करणारें ; बाधक . ४ परिवर्तनशील ; बदलणारें ; विकार पावणारें . ५ नाशवंत . [ विकार ] विकार्य - वि . रूपांतर किंवा बदल केला जाण्यास योग्य , शक्य , आवश्यक इ० [ सं . ]
 m  Change of form or nature. Disease. Passion, emotion.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.