विष्णुधर्मोत्तर पुराण एक उपपुराण आहे. वेगवेगळ्या कथांशिवाय या पुराणात ब्रह्माण्ड, भूगोल, खगोलशास्त्र, ज्योतिष, काल-विभाजन, कूपित ग्रह याशिवाय नक्षत्रांची शांती, प्रथा, तपस्या, वैष्णवांची कर्तव्ये, कायदे आणि राजनीति, युद्धनीति, मानव आणि पशुंच्या रोगांची चिकित्सा, खानपान, व्याकरण, छन्द, शब्दकोश, भाषणकला, नाटक, नृत्य, संगीत अशा अनेकानेक कलांची चर्चा केलेली आहे. हे पुराण विष्णुपुराणाचे परिशिष्ट पुराण मानले जाते.
विष्णुधर्मोत्तर पुराणात 'चित्रसूत्र' नावाच्या अध्यायात चित्रकलेवे महत्त्व सांगितलेले आहे.
वास्तविक विष्णुधर्मोत्तरपुराण स्वयं एक मोठे पुराण आहे, यात जवळजवळ १६ हजार श्लोक आहेत, ज्यांचे संकलन ६५० ई. च्या जवळपास झाले. या पुराणात तीन खण्ड आहेत. प्रथम खण्डांत २६९ अध्याय आहेत, ज्यात इतर पुराणांप्रमाणेच जगाची उत्पत्ति, भूगोल सम्बन्धी वर्णन, ज्योतिष, राजे आणि ऋषींची वंशावळी इ. आणि शंकरगीता, पुरूरवा, उर्वशीची कथा, श्राद्ध, वृत इत्यादी विषय आहेत.
द्वितीय खण्डांत १८३ अध्यायांत धर्म, राजनीति, आश्रम, ज्योतिष संबंधी पैतामह-सिद्धान्त, औषधि विज्ञान इत्यादि मानवाच्या जीवना संबन्धित विषय आहेत.
तृतीय ख्ण्डांत में ११८ अध्याय आहेत ज्यात संस्कृत आणि प्राकृत व्याकरण, शब्दकोष, छन्दशास्त्र, काव्यशास्त्र, इत्यादि साहित्यिक विषय तर आहेतच पण नृत्य और संगीत इत्यादि ललित कला आणि वास्तु प्रमाणेच ललित शिल्प-कलांचे पण विस्तृत विवेचन आहे.