806 views
सर्व धर्मात सांगितले आहे की सर्व प्राणीमात्रांचा आत्मा एकच आहे फक्त बाह्य शरीर वेगेवेगळे आहे तर मग मेल्यानंतर त्यांच्या आत्म्याचे काय होते? ज्या प्राण्यांची शिकार होते त्यांची भुते होतात का? झाली पाहिजेत ना? त्या आत्म्याला सुद्धां स्वर्ग नरकाचा फेरा असतो का? त्यांना पुनर्जन्म किंवा नशिबाचा भाग असतो काय? त्यांना सुद्धां जन्मज्न्मांतरीचा फेरा असतो का?
in Hindu - Beliefs by (11.2k points)

1 Answer

0 votes
हिंदू धर्म मान्यतेनुसार आत्म्याला मरण नाही. आत्मा फक्त शरीर बदलतो. जेव्हा आत्मा शरीर धारण करून या जगात जन्म घेतो तेव्हां तो कांही वासना सोबत घेऊन येतो. शिवाय सर्व प्राण्यांत माणसाचा मेंदू अतिशय प्रगत असल्याने त्याला विचारशक्ति, आध्यात्मशक्ति इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त असते. प्राण्यांना आपले पोट भरणे आणि वंश वाढवणे या पलिकडे कांहीही वासना नसतात. आता भूत विषयाचा विचार केल्यास भूत म्हणजे एक अतृप्त आत्माच होय. म्हणून जिवंतपणी राहिलेल्या अतृप्त इच्छा, वासना पूर्ण करून घेण्यासाठीच तर भूतयोनीत आत्मा प्रवेश करतो. वासनाच नसल्याने पक्षी किंवा प्राणी यांचा आत्मा अतृप्त राहण्या प्रश्नच उरत नाही, म्हणून पक्षी किंवा प्राण्यांची भूते होत नसावीत.
by (11.2k points)
...